॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

कोणी कोणाचं नसतं हे जर आधी समजलं असतं तर हे तुटणारं नातं मी कधीच जोडलं नसतं

1 year ago
approved

आयुष्य जगणं तेव्हा खूप अवघड वाटतं जेव्हा आवडणारी व्यक्ती नशिबात नसते

1 year ago
approved

आजकाल लोकांना नात्यापेक्षा EGO जास्त महत्वाचा आहे म्हणूनच एखादं नातं जास्त काळ टिकत नाही

1 year ago
approved

असं ऐकलयं की,श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण भेटायला येतात

1 year ago
approved

एकदा तरी तू भावना जाण ना आज तुला माझ्या असण्याची किंमत कळत नाहीए पण एक दिवस असा येईल तेव्हा तुला माझ्या नसण्याची किंमत 100 टक्के कळेल

1 year ago
approved

माझ्या भिजलेल्या पापण्यांना, अजून कितीवेळा पुसू सांगा, अनं तुझ्यासाठी मन माझं झुरतं

1 year ago
approved

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

1 year ago
approved

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक' नव्हतं.. तरीही माझ जीवन सुखाच होत ||१|| आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत, पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत.. तरीही माझ जीवन सुखाच होत ||२|| घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत, दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत, तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ || आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा, दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥ पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत.. तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥ शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता, पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं.. तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥ शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता, अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता - कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते, तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥ नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा, शाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते, तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ || वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा, कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत.. तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ || पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे, उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत, तरीही माझ जीवन सुखाच होत || १० || शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत, कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत, तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ || गावची जत्रा हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची, बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत, तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ || गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे, पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत, तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ || हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या - डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते, तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ || प्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा, होल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत, तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ || दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती, रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत.. तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ || जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची, रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा, तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ || खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा, पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत, तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ || मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत, विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत, तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ || घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे, पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत, तरीही माझ जीवन सुखाच होत || २० || पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा, गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत, तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ || आज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे, टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे, कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ || आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे, क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे, बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || २३ || आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे, एक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे, आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ || आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे, इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे.. म्हणून पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे, पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

1 year ago
approved

एक गंमत सांगू तुला ??? लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला.. पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला.. म्हातारपणी रुपायांनी खिसा भरला पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला... एक गंमत सांगू तुला ??? लहानपणी वाटायचं, नविन पुस्तके हवीत वाचायला.. पण मित्रांची पुस्तके उसनी घेवून अभ्यास पूर्ण केला.. म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला... एक गंमत सांगू तुला ???? लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला.. म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला पण जीना उतरेस्तवर पाय लागतात लटपटायला... एक गंमत सांगू तुला ???? लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला, दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला.. म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला, पण एकेक खोली आ वासून येते खायला... एक गंमत सांगू तुला ???? खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला, फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला.. मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला, का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला. म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका...

1 year ago
approved

बायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो... नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो.... बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... "लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... खऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... स्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला "नीट अभ्यास कर रे" असे पोट तिडकिने सांगू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... आपल्याच कालच्या मेहनतीच्या जोरावर आपला आज मजेत जगणारा अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच आज कॉम्प्रोमाइज करू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... ऑफिसात अनेकांचा बॉस बनून हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे ऐकतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... आपल्या अप्रेझल आणि प्रमोशनपेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल जास्त काळजी करू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत तो गुंगुन जातो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... गाडीतून सतत फिरणारा तो पोराच्या सायकलची सीट पकडून सायकलच्या मागे धावू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या चूका पोराने करू नयेत म्हणून प्रिचिंग सुरु करतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... "तुमचा काळ वेगळा होता, आता जमाना बदलला, तुम्हाला काय कळणार नाही. This is generation gap!" असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या बापाच्या आठवणीने हळवा होऊन मनातल्या मनात त्याची माफी मागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... पोरगा शिकून परदेशी जाणार, मुलगी लग्न करून परक्या घरी जाणार हे दिसत असून त्याकरिता स्वतःच प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो.... पोर मोठी करताना आपण कधी म्हातारे झालो हे लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो... कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धाश्रमाची पानगळ बनून, अगदीच नशीबवान असला तर नातवंडांसमवेत चार दिवस रमून... कसेही असले तरी भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत कधीतरी सरणावर चढतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो...!!!! तमाम बापांना शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢