॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com :: कविता | Marathi Poems

कविता | Marathi Poems

Please login to post a message.

Profile Picture Yashwant97


माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक' नव्हतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||
आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||
घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||
आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं
तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥
पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥
शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥
शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता - कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥
नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकादूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ ||
वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||
पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||
शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||
गावची जत्रा हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||
गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||
हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या - डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||
प्रवास झालाच तर एस्तीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
होल्डोलसोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||
दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||
जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||
खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||
मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||
घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||
पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||
आज घराऐवजी लक्झुरीयास फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणात आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||
आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लैनचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || २३ ||
आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्तिवितीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||
आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..
म्हणून
पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे,
पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Atul


आज पुन्हा पगार होणार,
बँकेचा अकाउंट भरून जाणार,
मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार,
मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार,
काय रे देवा...........

मग विकेंड येणार,
सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार,
थोडासा जास्ती खर्च होणार,
पण आपल्याला त्याची चिंता नसणार,
काय रे देवा...........

चार तारीख येणार,
होमलोन चा हफ्ता जाणार,
८०% अकाउंट रिकामा होणार,
थोडंस टेन्शन सुद्धा येणार,
काय रे देवा...........

पुन्हा विकेंड येणार,
या वेळेला फक्तं बोंबील आणणार,
फिश किती महाग झालंय असा विचार मनात येणार,
काय रे देवा...........

१५ तारीख येणार,
एल आय सी चे प्रिमिअम जाणार,
अकाउंट पूर्ण खिळखिळा होणार,
मनाची घालमेल वाढणार,
उरलेल्या पैशाचं प्लानिंग चालू होणार,
काय रे देवा...........

अजून एक विकेंड येणार,
फिश आता खूपच “महाग” झालेलं असणार,
आता वरणभात खाऊनच दिवस निघणार,
काय रे देवा...........
२५ तारीख येणार,
अकाउंट पूर्ण रिकामा झालेला असणार,
रिक्षा ऐवजी आता बस ने जावं लागणार,
कॉफी ऐवजी कटिंग चहा वर दिवस निघणार,
मन पुन्हा विचलित होणार,
काय रे देवा...........

३० तारीख येणार,
पुन्हा मनाला पालवी फुटणार,
पुन्हा छान छान प्लान शिजणार,
कारण......
आज पुन्हा पगार होणार..... आज पुन्हा पगार होणार......
काय रे देवा..........

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Atul


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत,
तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

स्वत:चं मन मारून,
तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं,
तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही,
नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय. हळूहळू.
या कामात मन रमत नाही,
असं वाटतं;

तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय.
हळूहळू.

- पाब्लो नेरुदा
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Atul


सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी-वाटीने ओतलं
तरी कमीच पडत तूप
बायको आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ
करिअर होतं जीवन मात्र
जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र
चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा 'स्वतःच्या घरी'
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी
सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेल

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Rahul


गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो
तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो,
ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,
त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो,
ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,
हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो,
चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,
ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,
नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,
तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,
आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,
बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,
मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,
रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,
मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,
कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,
आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


एक गंमत सांगू तुला ???
लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..
पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..
म्हातारपणी रुपायांनी खिसा भरला
पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला...


एक गंमत सांगू तुला ???
लहानपणी वाटायचं, नविन पुस्तके हवीत वाचायला..
पण मित्रांची पुस्तके उसनी घेवून अभ्यास पूर्ण केला..
म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला
पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला...


एक गंमत सांगू तुला ????
लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला
पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..
म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला
पण जीना उतरेस्तवर
पाय लागतात लटपटायला...


एक गंमत सांगू तुला ????
लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,
दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..
म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,
पण एकेक खोली आ वासून येते खायला...


एक गंमत सांगू तुला ????
खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,
फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..
मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,
का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

म्हणून म्हणतो मित्रांनो......आताच जगणं शिका...

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


तो म्हणाला आज 'वॅलेनटाइन डे'
ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे
चल ना गं.. मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ
ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ
तो लाडात.. थोडा रोमॅन्टिक !
ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक !
त्यानं म्हटलं, आज बायको नको गं..
तुझ्यातली प्रेयसी हवी
तिने हसत म्हणाली, तुम्हांला काय..!
रोज नवी फॅण्टसी हवी
तो म्हणाला चालेल गं, इतकंही हसलीस तरी !
हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी
त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली
आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली
त्याला म्हणाली..
वेड्या........!
हा 'वॅलेनटाइन डे ' फक्त
वर्षातून एकदाच साजरा होतो..
तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र
कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो..
नजरेत नजर मिसळायला
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही
अन एकरुप झालेल्या जीवांना
'वॅलेनटाइन 'चं लेबल लागत नाही

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!
स्वप्न फरारीच बघायच ...का
अपना बजाज मधे सुख शाेधायचं
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे
आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा.
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!
स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ....का
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं
What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं.
जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!
तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा.
मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का
निवडुंगाचे
कुंपण घालून विचार खुंटवायचे.
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं.....
का
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Yashwant97


तुझ्या आठवणींची सावळी छटा
काळ्या रात्रीत भासते, मी सावरता
सोडून गेलीस, तरी मनात आहे,
तुझा चेहरा, तुझं हसणं, आजही हरवलेलं आहे.

माझ्या विचारांत, तू आहेस सदा
माझ्या हृदयाच्या काठावरली तू नंदा
प्रेमाच्या गोड स्वप्नांत, आपण होतो एक,
आता मात्र एकटा, वाट पाहतो अनेक.

सूर्याच्या किरणांत, तुझं हास्य झळकते,
आकाशातल्या ताऱ्यांत, तुझी छाया भासते
पावसाच्या थेंबांत, तुझं नाव येतं,
हरवलेलं प्रेम, अजूनही मनात दाटतं.

कधी ओळखतेस का, त्या खास क्षणांना ?
ज्यात बागेत बसून, घेत होतो हातात तुझा हात
सध्या तू दूर, तरी हृदयात ठेवलंय चोरून,
त्या आठवणींच्या गडबडीत, जीव गेला थकून भागून.

प्रेमातली ती गोडी, आता उरली शील्लक
तू गेल्यावर जीवनात, काळोख झाला फिक्कट
तुझ्या संगतीचा धागा, आता तुटलेला आहे,
प्रेमाच्या वाटेवर, मी एकटाच फिरणारा आहे.

प्रेमिका, तू सोडून गेलीस, हे मान्य,
पण तुझ्या प्रेमाने दिलेलं, असं दुःख भव्य
तू परत येशील, अशी आशा आहे,
तुझ्या आठवणींच्या संगतीत, हृदय सदैव गहिवरलेले आहे !

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢